Ad will apear here
Next
शहापुरात वसुंधरा संजीवनी मंडळ बांधणार ‘चेक डॅम्स’
सत्संग परिवाराच्या पाणी अडवा मोहिमेला ‘एनजीओ’चे बळ
सत्संग परिवाराने ‘पाणी अडवा’ मोहिमेत बांधलेले वनराई बंधारे

ठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ब्रम्हलीन योगी ऋद्धीनाथबाबा सत्संग परिवाराचे प्रणेते योगी फुलनाथबाबांच्या ‘पाणी अडवा’ मोहिमेची दखल घेत ठाण्यातील वसुंधरा संजीवनी मंडळ या सामाजिक संस्थेने सत्संग परिवाराने श्रमदानातून बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांच्या जागी पक्के चेक डॅम्स बांधण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीक्षेत्र टाकेश्वर देवस्थान येथे नुकत्याच झालेल्या सभेत संस्थेचे संचालक आनंद भागवत यांनी ही माहिती दिली.  
 
भूजलपातळी वाढवणे, पशु-पक्ष्यांना पिण्यासाठी व गावकऱ्यांना स्वच्छतेसाठी पाणीसाठा निर्माण करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन टाकेश्वर मठाधिपती योगी फुलनाथबाबा यांनी सत्संग परिवारातील केंद्रांना वनराई बंधारे बांधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सावरोली (सो), बाबरे, मानेखिंड, आष्टे, खरीड, फोफोडी, खरांगण, ठुणे, नारायणगाव, दहिवली (पाटील) व नारिवली या गावांतील सत्संग केंद्रांनी सिमेंट गोणी व मातीचा वापर करत ११ वनराई बंधारे बांधले आहेत.



या संबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील शहापूर व मुरबाड तालुक्यात जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वसुंधरा संजीवनी मंडळ या बिगरशासकीय संस्थेने योगी फुलनाथबाबा यांची भेट घेऊन परिवाराने बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची जागेवर जाऊन पाहणी केली. या पाहणीतून हे बंधारे अनेक शेतकऱ्यांना दुबार शेतीसाठी उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आल्यामुळे या एनजीओने या बंधाऱ्यावर प्रत्येकी तीन ते पाच लाखांपर्यंत खर्च करून पक्के चेकडॅम्स निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.



टाकीपठार येथे योगी फुलनाथबाबा यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या सत्संग कार्यकर्त्यांच्या सभेत वसुंधरा संजीवनी संस्थेचे ज्येष्ठ संचालक आनंद भागवत यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून निधी उभा करून सत्संग परिवाराच्या मोहिमेला आर्थिक पाठबळ देणार असल्याची माहिती दिली. त्यासाठी आवश्यक ती कागदोपत्री माहिती कार्यकर्त्यांकडून भरून घेण्यात आली. या वेळी गणेश पोतदार, संतोष दवणे यांनी सत्संग परिवाराच्या पाणी अडवा मोहिमेची पार्श्वभूमी विशद केली. योगी फुलनाथबाबा व आनंद भागवत यांनी कार्यकर्त्यांना जलसंवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.
 
येत्या काळात वनराई बंधाऱ्यांच्या जागी पक्के चेक डॅम्स निर्माण झाल्यास शेकडो एकर क्षेत्रात दुबार पिके घेणे व शेतीपूरक व्यवसायांतून रोजगार निर्मिती करणे शक्य होणार असल्याने सत्संग परिवाराच्या मोहिमेचे व वसुंधरा संजीवनी मंडळाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZMSBW
 One more activity , taken up , not depending on government .
This is how it should be . It does not need high level of expertise ,
Good for local employment , local pride , does not need much
Initial investment . Hope , other places take up the idea .
Similar Posts
पडवळपाडा केंद्रशाळेला मिळाले आयएसओ मानांकन ठाणे : शहापूर तालुक्यातील पडवळपाडा या जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेला ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. ही ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची दुसरी व शहापूर तालुक्यातील पहिली ‘आयएसओ’ मानांकनप्राप्त शाळा ठरली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
डॉ. धानके यांचा गुणवंत अधिकारी पुरस्काराने गौरव ठाणे : पशुसंवर्धन विभागात सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. दिलीप धानके यांनी शासकीय सेवेत केलेल्या विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची ठाणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने गुणवंत अधिकारी म्हणून निवड केली होती. म्हसा यात्रेत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय पशु-पक्षी प्रदर्शनाच्या भव्य
शहापूरमध्ये भरणार ‘नाट्यजत्रा’ शहापूर : ग्रामीण भागातील कलेला व्यासपीठ मिळावे या हेतूने स्थापन केलेल्या ग्रामीण कला मंचातर्फे ‘नाट्यजत्रा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. १२ एप्रिल २०१९ रोजी प्रकल्पग्रस्त आणि अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या संघर्षाची गोष्ट मांडणाऱ्या वास्तवदर्शी ‘व्हाइट कॉलर’ या दोन अंकी नाटकाचा, तर १३ एप्रिलला समाजातील
राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिपमध्ये माधुरी तारमळेला रौप्यपदक शहापूर : तमिळनाडू सिलंबम असोसिएशन व इंडियन सिलंबम फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तमिळनाडूतील इरोड या शहरात टेक्स वॅली चितोड येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिप स्पर्धेत शहापूर तालुक्यातील माधुरी तारमळेने रौप्यपदकाची कमाई केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language